Tuesday, May 22, 2018

गज़ल


उन्हे झेलली सावलीलाच कळले नसावे
किती रापलो राबताना समजले नसावे

नदी कोणती वाहते अंगणातून माझ्या
घराला जल तिचे कधीही बिलगले नसावे

उभ्या भोवताली कनाती किती पांथिकांच्या
एकांतात रमणे फिरस्त्यास पटले नसावे

किती पदर होते तिच्या भाकरीला कळेना
मला कोरडे ढेकर कधीच पचले नसावे

तुला पाहण्या देव येतो इथे फक्त आई
तया आरसा पाहणे नित्य जमले नसावे

© विशाल कुलकर्णी
१७-०५-२०१८

No comments:

Post a Comment